Published On : Tue, Jun 18th, 2019

महाराष्ट्र बजेट 2019: दिव्यांगांसाठी घरकुल योजना; 100 कोटींची तरतूद!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर होत असलेल्या राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणेच घोषणांचा पाऊस पडत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विविध वर्गांसाठी वेगवेगळ्या योजना आणि भरीव निधी जाहीर करत असून ‘सबका साथ’ मिळवण्यासाठी ‘सब का विकास’ची ग्वाही दिली जात आहे. त्या अंतर्गत, दिव्यांगांसाठी घरकुल योजनेची घोषणा सरकारने केली आहे.

८० टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना सरकार घर बांधून देणार असून या योजनेसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून तयार केलेल्या या अर्थसंकल्पातील अन्य काही तरतुदी खालीलप्रमाणे…

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

>> महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीवर्षानिमित्त कार्यक्रम आयोजनासाठी १५० कोटी

>> सरपंच मानधन वाढीसाठी २०० कोटी

>> तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी बस स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी १०० कोटी

>> अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षासाठी १०० कोटी

>> सार्वजनिक आरोग्यासाठी १०,५७९ कोटींची तरतूद

>> गेल्या ४ वर्षांत १४० सिंचन योजना पूर्ण केल्या

>> दुष्काळी भागात मागेल त्याला शेततळे योजना सुरू

>> चार कृषिविद्यापीठांसाठी ६०० कोटींची तरतूद

>> जलयुक्त शिवार योजनेसाठी ८९४६ कोटींचा खर्च

>> जलसिंचन योजनेसाठी १ हजार ५३० कोटींची तरतूद

>> १ लाख ६७ हजार शेततळ्यांची कामं पूर्ण

Advertisement