नवी दिल्ली : नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत NTA म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा संस्था आणि केंद्र सरकारकडे या पेपरफुटीसंदर्भात काही प्रश्नांची उत्तर देण्यास सांगितले आहे.
ही उत्तरे न्यायालयासमोर सादर केल्यानंतर न्यायालय ही परीक्षा पुन्हा घ्यायची की नाही याबाबतचा आदेश देणार आहे. आज झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी काही प्रश्न विचारले.
या परीक्षेचा पेपर लीक कसा झाला ? हा पेपर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे लीक करण्यात आला आहे का ? पेपर लॉकरमधून बाहेर कधी काढण्यात आले होते? परीक्षा कुठल्या वेळी झाला ? असे प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारले. परीक्षेचे पावित्र्य भंग जाले तर पुन्हा परीक्षा घेण्यासंदर्भात आदेश दिला जाऊ शकतो असे न्यायालयाने म्हटले आहे.
नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत सदर प्रकरणाच्या तपासाची सद्यस्थिती न्यायालयापुढे मांडण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी गुरुवारपर्यंत वेळ देण्यात आला असून गुरुवारी या प्रकरणाची पुन्हा सुनावणी होणार आहे.