Published On : Wed, Oct 23rd, 2024
By Nagpur Today Nagpur News

ट्रेनमधील चादर, ब्लँकेट्स किती दिवसात धुतल्या जातात?भारतीय रेल्वेने आरटीआयला दिले ‘हे’ उत्तर

Advertisement

नागपूर :ट्रेनच्या एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान बेडरोल दिले जातात. एसी कोचमध्ये बर्थ बुक करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या सुरुवातीला दोन चादरी, उशा, टॉवेल आणि ब्लँकेटसह एक बेड रोल दिला जातो. मात्र, ट्रेनमध्ये मिळणाऱ्या बेडशीट आणि ब्लँकेट्स अस्वच्छ असल्याची तक्रार वारंवार प्रवाशांकडून केली जाते.

आरटीआयच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात भारतीय रेल्वेनेच या चादरी किती वेळा स्वच्छ केल्या आहेत याबाबत खुलासा केला आहे.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रेल्वेच्या उत्तरानुसार, चादर, उशा आणि टॉवेल प्रत्येक वापरानंतर स्वच्छ केले जातात. बेडशीट धुण्यासाठी रेल्वेने देशभरात 46 विभागीय लॉन्ड्री तयार केल्या आहेत. त्यामुळे वेळोवेळी ही धुलाई होत असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.

रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार बेडरोलसह दिलेले ब्लँकेट हे महिन्यातून एकदा स्वच्छ केले जाते. ब्लँकेट ओले झाले किंवा त्यावर काही पडले तर ते मध्येच स्वच्छ केले जाते, अन्यथा ब्लँकेट महिन्यातून एकदाच धुतात. रेल्वेने पुरविल्या जाणाऱ्या लोकरीच्या ब्लँकेटची देखभाल करणे खूपच अवघड आहे. तथापि, काही रेल्वे कर्मचाऱ्यांचे असे मत आहे की, काही वेळा ब्लँकेट धुण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागतो.

कंत्राटदारांच्या मनमानीमुळे साफसफाई योग्य प्रकारे होत नाही-
रेल्वेने विभागीय लॉन्ड्री बांधली असली तरी ती चालवायला कंत्राटदाराला दिली आहे. कंत्राटदारांच्या मनमानीमुळे साफसफाई योग्य प्रकारे होत नाही, त्यामुळे अनेकदा डब्यांच्या बेडरोलच्या तक्रारी येतात. गेल्या वर्षी रेल्वेने या लॉन्ड्रीच्या कंत्राट नियमात बदल केला.यापूर्वी हे कंत्राट दीर्घ कालावधीसाठी दिले जात होते, परंतु नंतर ते कमी करून 6 महिन्यांचे करण्यात आले, अशी माहितीही रेल्वे विभागाकडून देण्यात आली.

Advertisement