Published On : Tue, Apr 5th, 2022
By Nagpur Today Nagpur News

कॅटरिंगच्या व्यवसायाखाली मानवी तस्करी, एका कॉलमुळे नागपुरातील रॅकेटचा भांडाफोड

Advertisement

नागपूर : नागपुरात अंमली पदार्थ आणि तरुणींच्या तस्करीचं प्रकरण समोर आलं आहे. एका ऑडिओ कॉलवरुन पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. नागपूरच्या रिंग रोडवर असलेल्या लक्ष्मी हॉटेल मालकासह सहा आरोपींना पोलिसांनी अटक (Nagpur Crime) केली आहे. कॅटरिंगच्या व्यवसायाखाली मानवी तस्करी होत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओदिशा आणि देशाच्या इतर भागात कॅटरिंगच्या (Catering) व्यवसायात सहभागी असणाऱ्या मुलींच्या माध्यमातून अंमली पदार्थाची तस्करी केली जात होती. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

Wenesday Rate
Wednesday01 Jan. 2025
Gold 24 KT 76,900 /-
Gold 22 KT 71,500 /-
Silver / Kg 86,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपुरात अंमली पदार्थ आणि तरुणींची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ऑडिओ कॉलमुळे हा प्रकार समोर आला. नागपूरच्या रिंग रोडवर असलेल्या लक्ष्मी हॉटेल मालकासह सहा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

कॅटरिंगच्या व्यवसायाखाली मानवी तस्करी

कॅटरिंगच्या व्यवसायाखाली मानवी तस्करी केली जात असल्याचा आरोप आहे. ओदिशा आणि देशाच्या इतर भागात कॅटरिंगच्या व्यवसायात सहभागी असणाऱ्या मुलींच्या माध्यमातून अंमली पदार्थाची तस्करी केली जात होती. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

देह व्यापारासाठी बळजबरी

तर दुसऱ्या प्रकरणात तरुणींची तस्करी, विनयभंग आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. याही प्रकरणात कॅटरिंगच्या व्यवसायात असणाऱ्या मुलींना देह व्यापार करण्यास भाग पाडलं जात होतं.

या दोन्ही प्रकरणात आणखी आरोपी सहभागी आहेत. या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, नागपूर शहरात या दोन्ही प्रकरणावरुन शहरात खळबळ उडाली आहे. शहरात नक्की काय चाललंय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Advertisement