Advertisement
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा टी पॉईंटवर मंगळवारी पहाटे भीषण अपघात घडला आहे. भरधाव ट्रकने शेकडो मेंढ्या चिरडल्या असून स्थानिक नागरिकांच्या भीतीने ट्रक चालकाने घटना स्थळावरून पळ काढला. या घटनेत १०० मेंढ्यांचा मृत्यू झाला.
माहितीनुसार, मौदा टी पॉईंटजवळ रस्त्यावर सुमारे १०० ते १५० मीटरपर्यंत मेंढ्यांचे मृतदेह पडलेले होते. सद्या शेतात पिकाची पेरणी होत असल्याने मेंढ्यांचा कळप नागपूरवरून राष्ट्रीय महामार्गावरून (५३) भंडाराकडे जात होता. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे.