नागपुर– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच शिक्षक दिनी आज, सी.आय.टी.यु. नागपूर तर्फे आज 5 सप्टेबर रोजी, संविधान चौकात शेकडो आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांनी मोदी सरकार विरोधात तीव्र निदर्शने केली. मागील दोन वर्षांपूर्वी 5 सप्टेंबर 2018 रोजी तर्फे दिल्ली येथे कामगार शेतमजूर व शेतकरी यांचा लाखोच्या संख्येमध्ये मोदी सरकारच्या विरोधात देशव्यापी मोर्चा व विविध मागण्या करिता झालेला होता शक्तीप्रदर्शन करण्यात आले
त्याला दोन वर्ष होऊन गेले परंतु समाधानकारक मोबदला न मिळाल्यामुळे आज 5 सप्टेंबर रोजी, संपूर्ण भारतात मागणी दिन व संघर्ष दिन साजरा करण्यात आला. नागपूर शहरात संविधान चौकात एक दिवसीय संप करून आंदोलन करण्यात आले त्याचप्रमाणे आशा वर्कर्स अंगणवाडी व इतर कामगार, शेतकरी व शेतमजूर हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते. नागपूर येथे दुपारी १२ वाजता, संविधान चौकात आशा वर्करांनी शेकोडोच्या संख्यामध्ये शारीरिक अंतर ठेवून , तोंडाला मास्क लावून, उपस्थित राहून, मोदी सरकार विरोधी घोषणा देऊन आंदोलन केले.
मागण्या : –
१ ] सर्व योजना कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून घोषित करा.
२ ] कोरोणा कामाचे तीनशे रुपये रोज द्या.
३ ] सर्व कर्मचाऱ्यास ( २१००० ) एकवीस हजार रुपये वेतन द्या. ४ ]एपीएल /बीपीएल रद्द करून सरसकट प्रति लाभार्थी तीनशे रुपये द्या.
५ ] रिटायरमेंट नंतर दहा हजार रुपये महिना पेन्शन देण्यात यावा.
६ ] Pf / Esi लागू करा.
७ ] दहा लाख रुपये आजीवन विमा लागू करा.
अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले व आमच्या मागण्या मंजूर कराव्यात.
या मागणीसाठी बेमुदत संप सुद्धा घोषणा होऊ शकते. अशी घोषणा अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी यावेळी केली. आंदोलनाचे नेतृत्व राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, रूपलता बोंबले, पूर्णिमा पाटील, पुष्पा अंजु चोपडे, मनीषा बारस्कर, ज्योती कावरे, कल्पना हटवार, नीता भंडारकर, शुभांगी चीचमलकर या सर्व आंदोलनात सहभागी होत्या.