नागपूर: गोंडमोहल्ला पाचपावली येथे राहणाऱ्या दुर्गा उईके (28) हिला पतीसह सासरच्या मंडळींनी जाळून मारल्याचा आरोप होता. मात्र आज या आरोपातून नागपूर न्यायालयाने पतीसह सासरच्या मंडळींची निर्दोष सुटका केली.
विद्यमान अतिरिक्त सत्र न्यायाधीश नागपूर, श झेड ए शेख यांनी आरोपी असलेला पती विकी बुदेसिंग उईके 30 वर्ष 2)विश्वास बुदेसिंग उईके 33 वर्ष,3) श्रीमती आलोकी बुदेसिंग उइके 4) मथुरा ईश्वर वाळवे 32 वर्ष सर्व राहणार गोंडमोहल्ला पाचपावली नागपूर, यांची विकीची पत्नी दुर्गा उईके 28 वर्ष हिचा जाळून खून करण्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केलेली आहे.
सरकार पक्षाचे म्हणणे असे होते की मृतक दुर्गा हिचे आणि विकीचे नेहमी भांडण होत असे आणि ती आपल्या माहेरी राहण्यास जात असे.,दिनांक 28 ऑक्टोबर 2019 रोजी ती आपल्या माहेरी निघून गेली होती. दिनांक 30 ऑक्टोबर 19 रोजी वरील सर्व आरोपी रात्री आठ वाजता तिचे घरी गेले. त्यावेळी ती आपले कपडे धुत असताना आरोपी पती विकी यांनी तिचे हात पकडले, दीर विश्वास यांनी तेल टाकले आणि आरोपी क्रमांक तीन आणि चार यांनी जाळण्यास मदत केली म्हणून आरोपी विश्वास यांनी तिला पेटवून दिले.
दुर्गा ही पेटल्यानंतर आई शकुंतला कन्नाके भाऊ उमेश कन्नाके यांच्यासह दुसरा भाऊ लखन यांनी सह तिला मेयो हॉस्पिटल येथे दाखल केले. त्या ठिकाणी दुर्गा चा मृत्यूपूर्व जबाब पीएसआय गोडबोले यांनी नोंदवला. डॉक्टरांसमोर दिलेल्या वरील बयाणात सर्व घटना तिने सविस्तर सांगितली.आई आणि भावाच्या दबावामुळे तिने पती आणि सासरच्या मंडळींनी मला जाळले असल्याचे सांगितले. उपचारादरम्यान दुर्गा हीचा मृत्यू झाला. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात गुन्हा दखल करत पुढील तापस सुरू केला.मात्र सर्व माहिती खोटी असल्याचे तपासत सिद्ध झाले.
पूर्ण केस खोटी असून दुर्गा हिनेच आत्महत्या केलेली आहे आणि आरोपींना फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे असा युक्तिवाद करण्यात. सर्व परिस्थितीचा विचार करून विद्यमान न्यायाधीशांनी आरोपीच्या बचावात तथ्य आढळत असल्याचे सांगून आरोपींना निर्दोष मुक्त केले.सरकार तर्फे एपीपी तामगाडगे तसेच आरोपींतर्फे ॲड चंद्रशेखर जलतारे , चेतन ठाकूर यांनी काम पाहीले.