नागपूर : इमामवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जाटतरोडी परिसरात मंगळवारी पहाटे एका ४० वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन रोहनबाग नावाच्या मृत व्यक्तीसोबत पत्नीच्या अवैध संबंधांवर चिडलेल्या व्यक्तीने त्याच्या साथीदारांसह पहाटे साडेतीन वाजता त्याची हत्या केली.
माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, इमामवाडा पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीलाही अटक केली आहे, तर आणखी दोन गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेणे सुरु असून प्रकरणाचा
पुढील तपास सुरू आहे.