नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप नेत्यांवर टीका करण्यास सुरुवात केली. ते आपल्या भाषणातून शिवराळ भाषा बोलत आहे. यावरून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
ठाकरे यांच्यामध्ये असलेली निराशा त्यांच्या भाषणातील टीकेतून दिसत आहे. मी नागपुरी असल्यामुळे मला त्याच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येत. पण मला ते शोभत नाही. अनुभवी राजकारणी तसे बोलत नसतात. मात्र ते बोलत असल्यामुळे त्यांची राजकारणी म्हणून पातळी घसरली,असे फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत पराभव दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणातून शिवराळ भाषा बोलत आहे.
ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, जनता त्यांना जवळ करणार नाही. मुंबईमधील तीन जागा भाजप आणि तीन जागा शिवसेनेने लढायच्या असे, पूर्वीपासून ठरले होते. सुरुवातीला दक्षिण मुंबईची जागा आम्ही लढावी म्हणून आम्ही तयार देखील होतो.असेही फडणवीस म्हणाले.