मुंबई : ‘मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, ईश्वर साक्ष शपथ घेतो की…’ अशी शपथ वाचत देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार हाती घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज मुंबईतील आझाद मैदानावर पार पडला.
दरम्यान फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असून तरी एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्री होणाऱ्या यादीमध्ये ते सातवे व्यक्ती ठरले. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले होते. त्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे भाजप महायुतीचा मुख्यमंत्री विराजमान होणार हे निश्चित झाले होते. त्यातच काल भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.