Nagpur: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. महाविकास आघाडी सरकारचे हे पहिलचे अधिवेशन असून शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर या मुद्दय़ांवरून हे अधिवेशन चांगलेच तापण्याचे संकेत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाच निषेध म्हणून, या अगोदरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या आमदारांनी ‘मी पण सावरकर’ असे वाक्य लिहिलेली भगवी टोपी घालून विधीमंडळ परिसरात प्रवेश केला आहे.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. महाविकास आघाडी सरकारचे हे पहिलचे अधिवेशन असून शेतकरी, स्वातंत्र्यवीर सावरकर या मुद्दय़ांवरून हे अधिवेशन चांगलेच तापण्याचे संकेत आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाच निषेध म्हणून, या अगोदरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. त्यानंतर आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या आमदारांनी ‘मी पण सावरकर’ असे वाक्य लिहिलेली भगवी टोपी घालून विधीमंडळ परिसरात प्रवेश केला आहे.