नागपूर : शिवसेना (UBT) संजय राऊत यांनी अयोध्येतील राम मंदिरासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, हे राम मंदिर अयोध्येतील वादग्रस्त जागेवर नाही तर तेथून चार किलोमीटर अंतरावर बांधण्यात आले आहे, अशी टीका राऊत यांनी भाजपवर केली. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर पलटवार केला. माझे तत्वज्ञान आहे की मी मूर्खांना उत्तर देत नाही, परंतु मला त्यांना सांगायचे आहे की त्यांनी हिंदूंचा अपमान करणे थांबवावे. रामजन्मभूमी आंदोलनात तुमचे कोणतेही योगदान नाही. उद्धव ठाकरेंची सेना असे बोलून कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावत आहे, जे चुकीचे आहे, असा घणाघात फडणवीसांनी केला.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली होती. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, हे राम मंदिर अयोध्येतील वादग्रस्त जागेवर नाही तर तेथून चार किलोमीटर अंतरावर बांधण्यात आले आहे. त्यामुळे यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर वही बनेगा’ असा भाजपचा नारा होता.
पण तिथे जाऊन मंदिर बांधले आहे की नाही ते बघावे. जिथे मंदिर बांधण्याची चर्चा होती तिथे मंदिर बांधलेच नाही. तिथून चार किलोमीटर अंतरावर बांधलेले मंदिर आहे. कोणीही बनवू शकतो. पण आम्ही त्यावर चर्चा करू इच्छित नाही. ती वादग्रस्त जागा अजूनही तशीच आहे. यावर भाजपने बोलावे, असे संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.