नागपूर : सना खान हत्याकांडात माझा कुठलाही संबंध नाही. शर्मा पोलीस चौकशीसाठी उपस्थित झाले तेव्हा त्यांनी या प्रकरणाची मला काहीही माहिती नसून याबाबत माझा काहीही संबंध नाही असा दावा केला.आमदार शर्मा चौकशी दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमित शाहू व त्याच्या साथीदारांना आमदारासमोर उपस्थित केले.सर्वांना एकत्रित बसवून पोलीस अधिकारी चौकशी करत आहेत.
चौकशी सुरू असताना मृतक सना खान यांची आई मेहरूनिसा खान यादेखील कार्यालयात उपस्थित झाल्या.अमित साहू सुमारे पंधरा वर्ष अगोदर आमदार शर्मा यांच्यासाठी काम करत असल्याची माहिती आमदार शर्मा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या नेत्या सना खान यांच्या हत्या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. सना खान दोन ऑगस्टला जबलपूरला गेल्यावर तीन ऑगस्टला अमित ऊर्फ पप्पू शाहू याने तिचा खून केला. त्यानंतर त्याने मृतदेह नदीत फेकल्याचे सांगितले. मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती मृतदेह आढळला नाही.
दुसरीकडे मानकापूर पोलिसांनी या प्रकरणात जबलपूर येथील आमदार संजय शर्मा यांना २३ ऑगस्टला पोलिसांनी हजर होण्याची नोटीस पाठविली होती.मात्र आमदार शर्मा आज चौकशीसाठी नागपुरात दाखल झाले होते.