Published On : Thu, Jun 13th, 2024

येत्या चार-पाच महिन्यात मला सरकार बदलायचे;शरद पवारांच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण

Advertisement

इंदापूर :लोकसभा निवडणुकीत देशात इंडिया आघाडीने भाजपाप्रणित एनडीएमध्ये तगडी लढत पाहायला मिळाली. तर महाराष्ट्रातही महविकास आघाडीने मोठे यश मिळविले. उद्धव ठाकरेंच्या पक्षाने राज्यात नऊ तर शरद पवारांच्या पक्षाने आठ जागा जिंकल्या.

दरम्यान, हे दोन्ही नेते आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. चार-पाच महिने थांबा, मला सरकार बदलायचे आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांना रस्त्यावर उतरावे लागेल,असा इशारा पवार यांनी इंदापूर येथे बोलतांना दिला.

Advertisement

पुरंदर तालुक्याच्या कोळविहिरे येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी शरद पवार यांनी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, तुम्ही चार-पाच महिने थांबा, मला राज्यात सरकार बदलायचे आहे. हे सरकार बदलल्याशिवाय आपल्याला शेतकऱ्यांसाठी हवी तशी धोरणं राबवता येत नाहीत. सरकार बदलल्यावर आपण शेतकऱ्यांसाठी कामं करू, असे पवार म्हणाले.