Advertisement
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमधून ( शरदचंद्र पवार ) भाजपमध्ये घरवापसी करणारे आमदार एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश रखडला आहे.
मात्र त्यांनी केलेल्या मोठ्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष वेधले. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते.पण आता मी यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही, असे खडसे म्हणाले. माझा भाजपमध्ये प्रवेश होईल हे तावडे यांनी सांगितले आहे, म्हणून मी निश्चिंत आहे.
माझ्या भाजप प्रवेशाबद्दल गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, देवेंद्र फडणवीस या तिघांचा आता विरोध नाही.
मुळात विरोध नव्हताच, त्यांचे नाराजीचे सूर होते. ती नाराजी आता दूर झाली आहे,असे खडसे म्हणाले. भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे भाजपचा प्रचार करावा, तसेच रक्षा खडसे माझ्या सून आहे. या दोन्ही भूमिकेतून मी भाजपचा प्रचार करत असल्याचेही खडसे म्हणाले.