नागपूर/मुंबई: नागपूर महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून वीरेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २००६ च्या आयएएस बॅचचे अधिकारी वीरेंद्र सिंग हे सध्या मुंबई महापालिकेत संचालक पदावर कार्यरत आहेत. बुधवारी पुन्हा राज्यातील विविध विभागातील २७ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या.
यामध्ये जाहीर झालेल्या यादीप्रमाणे मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) चे आयुक्त युपीएस मदन यांना वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नेमण्यात आले. तर त्यांची जागा आर. ए. राजीव घेतील. ते पूर्वी अर्थ विभागामध्ये वित्त सचिव म्हणून कार्यरत होते. शहर आणि औद्योगिक विकास प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक भूषण गगराणी यांची मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मिलिंद म्हैसेकर यांची म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ म्हणून नेमणूक झाल्यावर जून २०१७ पासून हे पद रिक्त होते.
राजीव कुमार कुमार मित्तल हे महाट्रांस्कोचे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक आहेत ते आता सिडकोचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. तर त्यांची जागा पराग जैन नैनुतीआ हे त्यांची जागा घेतील. ते सध्या विक्रीकर विभागात विशेष आयुक्त पदावर कार्यरत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी आयुक्त जे. वेलरासू यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण येथील अंधारवाडी डम्पिंग ग्राउंडमध्ये आग सतत आग लागण्याच्या घटनांमुले मागील काही महिन्यांपासून ते रजेवर आहेत.
तर सामान्य प्रशासन विभागाच्या महासचिव नीलिमा केरकट्टा यांना खाडी गावाच्या सीईओपदी नियुक्त करण्यात आले आहे. ठाणे येथे कार्यरत अतिरिक्त ट्रायबल कमिश्नर सी. के. डांगे यांची जळगावच्या मानपयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत शंतनू गोयल यांना परभणीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे.