हिंगणा: उमेदवार कुठल्याही पक्षाचा असो सक्षम लोकप्रतिनिधी निवडून दिल्यास विकासकामांची गती वाढते, असे प्रतिपादन आमदार समीर मेघे यांनी केले. आमदार समीर मेघे व जिल्हा परिषद सदस्या अर्चना गिरी यांच्या १ कोटी ८० लाखांच्या संयुक्त विकास निधीतून ईसासनी-डिगडोह जिल्हा परिषद सर्कलमधील प्रमुख रस्ते व इतर बांधकामाचे भूमिपूजन पार पडले.
भूमिपूजनाला आमदार समीर मेघे, जि.प. सदस्या अर्चना कैलाश गिरी, माजी जि. प. सदस्य अंबादास उके, ईसासनीचे सरपंच अरविंद ढोणे, माजी जि. प. सदस्य राजू हरडे, माजी जि. प. सदस्या सुचिता ठाकरे, सुशीलकुमार दीक्षित, पं.स. सदस्य, लीलाधर पटले, गीता हरिणखेडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस विनोद ठाकरे, शहर अध्यक्ष अनिल शर्मा, माजी उपसभापती सुरेश काळबांडे, जिल्हामहामंत्री आदर्श पटले, महेश लोखंडे, डिगडोहचे माजी सरपंच चेतनलाल पांडे, दामोदर सांगोळे,इंद्रायणी काळबांडे, प्रदीप इंगोले, माजी उपसरपंच कैलाश गिरी, राजू घाटोळे, बाळासाहेब वाघमारे, शैलेश सिंग, डॉ. अंकुश बुरंगे उपस्थित होते. संचालन कैलाश गिरी यांनी केले. सरपंच ढोणे यांनी आभार मानले.
परिसरातील भाजपचे पदाधिकारी रविंद्र कोकाटे, नवल सिंग, उषा मसराम, रामदास वैराळे, शशिकला ठाकरे, चंद्रशेखर राऊत, विजय डहाके, सिमा शर्मा, इंदू चौधरी, सिद्धार्थ वाणी, जितू पटले, लहानू जीवतोडे, अश्विनी उईके, संदीप साबळे, मिना वानखेडे, राजेश बोरकर, ज्योती कथलकर, प्रियाताई वासनिक, प्रीती राऊत, गीता ठाकरे, जयश्री चव्हाण, योगेश्वरी गायधने, रेखाताई चव्हाण, ज्ञानेश्वर कोकुर्डे, हेमंत देशमुख, लता पांडे, प्रजेश तिवारी, प्रजयराम जांभळे, शशिकला ठाकरे, दीपा वर्मा, सुरेश गांधी, मनीषा भुजे, अनिल सिंह, प्रमोद दुबे, धनराज ढोरे, कटरणे, ढोरे, नंदविकरजी, विष्णुपंत बानाईत, बबनराव ठाकरे, दिलीप विश्वकर्मा, तिडके, विनय सिंह, दिलीप यादव, श्रीकृष्ण जोशी, शोभा लोखंडे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.