नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटात खळबळ निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये भारतीय जनता पक्षाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेले महविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केल्यानंतर भाजप नेत्यांची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक वाढताना दिसत आहे. या राजकीय समीकरणांमुळे शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री भांबावले आहेत. एकनाथ शिंदे यांना बाजूला करून राष्ट्रवादी-भाजपने सरकार स्थापन केले तर शिंदे कुठे जातील? असा सवाल शिंदे सरकारमधील एका संतप्त कॅबिनेट मंत्र्याने केला. मात्र आमच्या भाजपवर विश्वास असून असे काहीच होणार नसल्याचेही शिवसेनेचे मंत्री म्हणत आहेत. एकनाथ शिंदे यांनी धाडस करून शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे, असेही मंत्री म्हणाले. दरम्यान या भाजप आणि राष्ट्रवादीच्या जवळीकीच्या चर्चांवर आमच्याकडून शांत बसून तमाशा पाहण्याची अपेक्षा करू नका,” असा इशारा दुसर्या एका मंत्र्याने दिला आहे. शिवसेनेचे आमदार आणि मंत्री या वृत्तावर नाराज आहेत. सर्वोच्च न्यायालयात अपात्रतेच्या याचिकेमुळे त्यांच्या भवितव्यावर अनिश्चिततेचे ढग दाटून आल्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ३९ आमदारांना डावलून महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याचा भाजपचा डाव आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस विघटनाच्या मार्गावर असल्याचा आणखी एक धक्कादायक दावा या मंत्र्याने केला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे विरोधी पक्ष नेते अजित पवार आहेत.अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षनेतृत्वावर नाराज असल्याच्या चर्चाही सुरु आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने आणि आक्रमकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती अदानी यांचा विरोध करत असताना अजित पावरा यांनी अदानी यांना पाठींबा दिल्याचे दिसले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यावर मोठा वाद पेटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिंदे मंत्र्याच्या म्हणण्यानुसार, शरद पवार, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जहाजात उडी मारून भाजपशी हातमिळवणी करणे शक्य होईल असे वाटत नाही.
सध्याच्या विधानसभेत 105 आमदार असलेल्या भाजपला 288 सदस्यांच्या सभागृहात सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेला दोनतृतीयांश आकडा पार करण्यासाठी आणखी 40 आमदारांची गरज आहे. जून 2022 मध्ये पक्ष फुटण्यापूर्वी शिवसेनेकडे 56 आमदार होते, तर राष्ट्रवादीकडे 54 आमदार आणि काँग्रेसचे 44 आमदार. काँग्रेस नेत्यांनी पक्षात फूट पडण्याची शक्यता ठामपणे नाकारली.त्यांच्या दोन माजी मंत्र्यांनी नाव न सांगता या वार्ताहराला सांगितले की, भाजपने महाविकास आघाडीत तेढ निर्माण करण्यासाठी अशा कथा रचल्या आहेत. खरे तर राष्ट्रवादीची अधिकृत भूमिकाही याच धर्तीवर आहे. अंजली दमानिया (माजी आप महाराष्ट्र संयोजक) यांच्या मदतीने अशा बातम्या प्रसार माध्यमांमध्ये पसरवून त्यांना महाविकास आघाडीत फूट पडायची आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर त्यांच्या मंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षा आटोक्यात ठेवण्यासाठी दबाव आणायचा असल्याचे या बातम्या पसरविण्यात येत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो म्हणाले.
आगामी २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. काहीही करून भाजपाला या दोन्ही निवडणुकांमध्ये आपले पारडे जड करायचे आहेत. पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत एक वर्ष राज्यात राष्ट्रपती राजवट भाजपला नको आहे, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेत्याचे म्हणणे आहे.
तर दुसरीकडे शरद पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली; 2014 मध्ये पवारसाहेबांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. सत्तेत असलेल्या पक्षासोबत सत्तेला चिकटून राहण्यासाठी आणि संधी मिळाल्यास ते भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची संधी वाया घालवणार नाहीत, असे एका काँग्रेस नेत्याचे म्हणणे आहे. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसोबत सत्ता स्थापन करू शकते. मात्र या सर्व घडामोडी सुरु असताना एकनाथ शिंदे साहेब शांत बसून भजन गातील, अशी अपेक्षा करू नका,अशा शब्दात शिंदे गटातील एका नेत्याने आपला राग व्यक्त केला.