-आधी लेखी की मदत ,सेवाग्राम एक्स्प्रेसमधील घटना
नागपूर: एक वृध्द प्रवासी सेवाग्राम एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात निपचित अवस्थेत होता. त्याची कुठल्याही प्रकारची हालचाल नव्हती. त्याला तातडीने औैषोधोपचाराची गरज होती. रेल्वे डॉक्टर घटनास्थळी पोहोचले. तपासून औषोधोपचार केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज होती. मात्र, वृध्द प्रवासी जिवंत की मृत अशी लेखी स्वरुपात माहिती हवी असा प्रश्न लोहमार्ग पोलिसांनी उपस्थित केला. त्यामुळे रेल्वे कर्मचारी मागल्या पावलीच परतला. नंतर वृध्दाला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. पण, रेल्वे डॉक्टर वेळेत पोहोचले नसते तर.
नत्थु खेकाडे (६६) असे त्या वृध्द प्रवाशाचे नाव आहे. ते १२१३९ मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेसने नाशिकहून प्रवास करीत होते. मंगळवारी सकाळी ५.५८ वाजता सेवाग्राम एक्स्प्रेस नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वर पोहोचली. त्यावेळी नत्थु खेकाडे निपचित पडून असल्याची सूचना रेल्वेला मिळाली. त्यानुसार उपस्टेशन व्यवस्थापकांनी लगेच मेयो तयार करून लोहमार्ग पोलिस ठाण्यात पाठविले. तत्पूर्वी रेल्वे डॉक्टरांनाही सूचना दिली. रेल्वे डॉक्टर आपल्या चमुसह फलाट क्रमांक ६ वर पोहोचले. मात्र, लोहमार्ग पोलिसांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. उलट वृध्द प्रवासी जिवंत की मृत अशी लेखी स्वरुपात माहिती हवी असा प्रश्न लोहमार्ग पोलिसांनी उपस्थित केला. त्यामुळे रेल्वे कर्मचारी ठाण्यातून मागल्याच पावली परतला.
दरम्यान आरपीएफ जवान घटनास्थळी पोहोचला. तिकडे रेल्वे डॉक्टरांनी वृध्दाची तपासणी करून औषोधोपचार केला. रुग्णवाहिका बोलाविली. दरम्यान दुसèयांना रेल्वे कर्मचारी लोहमार्ग ठाण्यात पोहोचला. यावेळी लोहमार्ग पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि वृध्दाला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, लोहमार्ग पोलिसांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाची उपस्टेशन व्यवस्थापकांनी रेल्वेच्या रजिस्टर मध्ये नोंद केली आहे.