Published On : Wed, Jan 31st, 2024
By Nagpur Today Nagpur News

EVM है तो मोदी है…;संजय राऊतांचे टीकास्त्र

Advertisement

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘EVM है तो मोदी है’,अशा शब्दात राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. भाजपच्या चंदीगड पॅटर्नवरून हे स्पष्ट झाले आहे.

लोकसभा 2024 निवडणूक जिंकण्यासाठी भाजपच्या नियोजनावर राऊत यांनी टीका केली. त्यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. उत्तर प्रदेशच्या एका दुकानात 200 तर भाजप पदाधिकाऱ्यांच्या ट्रकमध्ये 300 EVM मशीन सापडल्याचा गंभीर आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. उत्तर प्रदेशातील चांडोल येथे एका दुकानात 200 ईव्हीएम मशीन आढळल्या. आसाममध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या नावे असलेल्या एका ट्रकमध्ये 300 ईव्हीएम मशीन सापडल्या.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भारत इलेक्ट्रिकल कंपनीच्या संचालकांमध्ये भाजप पदाधिकारी नेमण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये बहुसंख्य लोक हे गुजराती असल्याचा आरोप त्यांनी केला. राजकोट येथील मनसूखभाई हे त्यात आहेत. लोकशाही निवडणुकीत भाजप मनसूख पॅटर्न, चंदीगड पॅटर्न आणू पाहत असल्याची टीका राऊत यांनी केली.

Advertisement
Advertisement