विना तिकीट प्रवास करणाऱ्याला दंड
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने संचालित ‘आपली बस’ने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध दंडनीय कारवाई होणार असून जर वाहक तिकीट देत नसेल देत तर त्याची माहिती मनपाच्या परिवहन विभागाला देण्यात यावी, असे आवाहन मनपा परिवहन विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकाच्या माध्यमातून परिवहन विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ‘आपली बस’मध्ये प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाने तिकीट काढावे, असे आवाहन केले आहे. प्रवास करताना तिकीट न आढळल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येईल, असेही त्यात म्हटले आहे.
यासंदर्भातील सूचना शहर बसच्या आतील दर्शनी भागात प्रवाशांना दिसेल, अशा ठिकाणी लावण्याची सूचना बस ऑपरेटर्सना करण्यात आली आहे. वाहक योग्य तिकीट देत नसल्यास प्रवाशांनी ०७१२-७७९०९९ अथवा भ्रमणध्वनी क्रमांक ७५०७०००४६५ यावर संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहनही केले आहे.