Published On : Tue, May 30th, 2017

वेळेत हजर न राहिल्यास कारवाई करणार

Advertisement


नागपूर:
कर्मचाऱ्यांनी वेळेत हजर न राहिल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी लेटलतीफ कर्मचाऱ्यांना दिला.

नेहरूनगर झोन व लकडगंज झोनच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे होते.
नागपूर महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयाच्या वेळा बदलविण्यात आलेल्या आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत शहरातील सर्व झोनचे कामकाज आज मंगळवारपासून सुरू होणार होते. त्या पार्श्वभूमीवर हा पाहणी दौरा आयोजित करण्यात आलेला होता. नेहरूनगर झोन मध्ये ७० पैकी फक्त १० कर्मचारी उपस्थित असल्याने उपमहापौरांनी नाराजी व्यक्त केली व उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले. उद्यापासून वेळेत हजर न राहिल्यास कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दिली. लकडगंज झोनमध्येही तीच परिस्थिती दिसून आली.

नेहरूनगर व लकडगंज झोन मधील बाय़ोमॅट्रिक मशीन्समध्ये बिघाड असल्याने ती त्वरित दुरुस्त करावी. कर्मचाऱ्यांनी वेळेत येऊन नागरिकांच्या सर्व समस्या सोडव्यावात, नागरिकांची कुठलीही तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी यावेळी दिला. तत्पूर्वी मान्यवरांनी दोन्ही झोनच्या विविध विभागांची पाहणी केली व व्यवस्थेचा आढावा घेतला. झोनमध्ये असलेल्या समस्या जाणून घेतल्या व त्याची पूर्तता लवकारत लवकर करण्यात येईल असे आश्वासन यावेळी उपमहापौरांनी दिले.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above


लकडगंज झोनमध्ये पिण्याच्या पाण्याचे नळ वाहतांना दिसले. त्या नळावर त्वरित तोटी बसवून देण्याचे आदेश उपमहापौरांनी ओसीडब्ल्यूच्या अधिका-यांना दिलेत. यानंतर अशी लापरवाही खपवून घेतली जाणार नाही, असेही ते म्हणाले. या पाहणीप्रसंगी लकडगंज झोनचे अतिरिक्त सहायक अधीक्षक राजेंद्र बावनकर, राजेंद्र गोतमारे उपस्थित होते.

Advertisement