Published On : Thu, Apr 13th, 2023
By Nagpur Today Nagpur News

सतत दीड तास नवी गाडी चालवत असाल तर सावधान,आरोग्यासाठी ठरणार घातक !

Advertisement

नागपूर : प्रत्येकालाच नवीन कार खरेदी करण्याचा मोह असतो . मात्र हीच नवीन कार आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. एका सर्व्हक्षणातून ही माहिती उघड झाली आहे. कारण नवीन कारमध्ये असे अनेक घटक असतात, जे उच्च तापमानात तुमच्या शरीराला हानी पोहोचवतात. त्यामुळे व्यक्तीला कर्करोग देखील होऊ शकतो.

जर तुम्ही तुमची कार सलग 12 दिवस उघड्यावर सोडली असेल. त्यावर छप्पर नव्हते. ते झाकलेले नसे तर त्यामुळे तुमच्या शरीरात कर्करोगाचे कण दाखल होऊ शकतात. हा अभ्यास अमेरिका आणि चीनच्या शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे केला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जंतुनाशक आणि गॅस स्टोव्हमध्ये आढळणारे फॉर्मल्डिहाइड कारमध्ये देखील आढळते.

Gold Rate
21 April 2025
Gold 24 KT 96,700 /-
Gold 22 KT 89,900 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चीनमध्ये, कारमधील फॉर्मल्डिहाइडचे प्रमाण राष्ट्रीय सुरक्षा मानकांपेक्षा 35 टक्के जास्त असल्याचे आढळून आले आहे. तर एसिटाल्डीहाइडचे प्रमाण ६१ टक्क्याहून अधिक असल्याचे आढळून आले आहे.

एसीटाल्डिहाइड हा वर्ग-2 कार्सिनोजेनिक घटक आहे. पेंट, पेट्रोल आणि सिगारेटमध्ये बेंझिन आढळते. ज्यामुळे वाहनचालकांच्या फुफ्फुसांचा आजार होऊ शकतो. तुम्ही जास्त वेळ कार चालवत असाल तर बेंझिन हानिकारक आहे. मात्र त्याचे मागे बसलेल्या प्रवाशांवर कोणतेच परिणाम होऊ शकत नाही.
प्रत्येक नवीन कारमध्ये विविध जैविक पदार्थांपासून वाढीव आजीवन कर्करोगाचा धोका (ILCR) वाढतो. जर ILCR पातळी 10-6 असेल तर ते ठीक आहे. पण जर ही पातळी 10-6 ते 10-4 च्या दरम्यान असेल तर कर्करोगाचा धोका असतो. जर ते 10-4 च्या वर असेल तर अधिक धोका आहे. शास्त्रज्ञांनी नवीन कारच्या आत या पदार्थांचा अभ्यास केला जो कडक सूर्यप्रकाशापासून पावसापर्यंतच्या हंगामात बंद होता.

Advertisement
Advertisement