करियर मार्गदर्शन शिबीर उत्साहात
खापरखेडा- ग्रामिण भागातील मुलांचा आत्मविश्वास वाढविण्याच्या दृष्टीकोनातून सावनेर पंचायत समिती सदस्य राहूल तिवारी यांच्या संकल्पनेतून चनकापूर मैदानात दिनांक ११ फेब्रुवारी बुधवारला करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते करिअर मार्गदर्शन शिबिरात ग्रामिण पोलीस अधिक्षक राकेश ओला, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुभेजकर, सावनेर पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते याप्रसंगी ग्रामिण पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी शेकडो मुलांना मार्गदर्शन करतांना ज्या फिल्ड मध्ये करियर करायचे आहे
त्यात मनापासून पूर्ण तयारी करने आवश्यक आहे सतत प्रयत्न केल्यास यश निश्चित तुमच्या पदरात पडेल असे सांगितले यावेळी त्यांनी आपल्या खाजगी जिवनातील काही गोष्टी सांगायचे विसरले नाहीत ग्रामिण पोलीस अधिक्षक राकेश ओला हे आपल्या विद्यार्थी जिवनात पीएमटी परीक्षेत अनुत्तीर्ण झाले होते शिवाय पीएसआय परीक्षेत सुद्धा अनुत्तीर्ण झाले होते मात्र ते निराश झाले नाही प्रयत्न करीत राहिले न्यायाधीश बनले राजस्थान मध्ये न्यायाधीश असतांना त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली व आईपीएस अधिकारी झाले त्यामूळे जिवनात हताश होऊन चालत नाही
यावेळी करियर मार्गदर्शन शिबिरात उपस्थित असलेल्या मुलांना पोलीस भर्ती संदर्भात आवश्यक सूचना दिल्या करिअर मार्गदर्शन शिबिरात नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी विस्तारपूर्वक स्पर्धा परीक्षेची माहिती मुलांना समजावून सांगितली कोणत्याही स्पर्धा परीक्षेचे चार पुस्तके वाचण्यापेक्षा एकाच पुस्तकाचे चार वेळा वाचन करा यासोबतच दुसऱ्याची क्षेत्रात जाण्याचा अभ्यास करा यश नक्की मिळेल सावनेर पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी अनिल नागने यांनी दोन चार लहान गोष्टी सांगून त्यातून आपल्याला जिवन कस सार्थक करता येईल हे उत्तमरित्या समजावून सांगितले यावेळी प्रामुख्याने जि.प.प्रकाश खापरे, निलिमा उईके, सावनेर पंचायत समिती सभापती अरुणाताई शिंदे, मुख्य आयोजक व पंचायत समिती सदस्य राहूल तिवारी, चंद्रशेखर पदम, सिल्लेवाडा कोळसा खाणीचे व्यवस्थापक चौधरी, नवनियुक्त सरपंच पवन धुर्वे, उपसरपंच रिंकू सिंग, मुख्याध्यापक लक्ष्मण राठोड, मधू दुगाने, प्रदीप कमाले, पत्रकार सुनील जालंदर, विनोद गौतम, खुशाल इंगोले आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार अंकुश भडांगे यांनी केले.