नागपूर : बेलतरोडी पोलिसांनी मोठी कारवाई करत बेकायदेशीर गायींच्या तस्करीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. या कारवाईत पोलिसांनी ६० गुरांची सुटका केली.
ही गुरे मध्य प्रदेशातून तेलंगणाला बेकायदेशीरपणे नेली जात होती.
गुप्त माहितीच्या आधारे बेलतरोडी पोलिसांच्या डीबी टीमने पंजरी टोल पोस्टवर नाकाबंदी केली होती. त्यादरम्यान पोलिसांना हा ट्रक येताना दिसला. पोलिसांनी ट्रक थांबवून त्याची झडती घेतली तेव्हा त्यांना त्यात ६४ गुरे आढळली. जी अतिशय क्रूरपणे बांधलेली होती. त्यापैकी चार गुरे मृत्युमुखी पडली होती.
याप्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील ट्रक चालक असलम खान हकीम खान याला अटक केली आहे. तसेच कारवाईत ट्रक आणि गुरांसह एकूण ४० लाख रुपयांचा माल जप्त केला.तर वाचलेल्या प्राण्यांना गोरक्षक केंद्रात पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.