Published On : Wed, May 29th, 2019

हिंगणा येथील अवैध बांधकामावर नासुप्र’चा हाथोडा

Advertisement

नागपूर: हिंगणा येथील गुप्ता हॉटेल ते मिहान सिमेपर्यंत २४.०० मी. डी.पी. रस्त्यावर असलेले अनधिकृत बांधकाम आज मंगळवार दिनांक २८.०५.२०१९ रोजी नागपूर सुधार प्रन्यासतर्फे हटविण्यात आले. अतिक्रमणधारक खंगार यांनी याठिकाणी अवैधरित्या कच्चे व पक्के बांधकाम केले होते. यापूर्वी अतिक्रमणधारकास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ अन्वये नोटीस तामील करण्यात आली होती. मात्र अद्याप अतिक्रमण न हटविल्यास आज नासुप्र’च्या अतिक्रमण पथकाने पुरेश्या पोलीस बंदोबस्तात या कारवाईला अंजाम दिले. सदर कारवाई दरम्यान नामप्रविप्रा अंतर्गत पश्चिम विभागातील सहायक अभियंता (पश्चिम) श्री. भूपेश मेश्राम, सहायक अभियंता-२ श्री. एच ए माहुले आणि नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख श्री.मनोहर पाटील उपस्थित होते.

Advertisement

Gold Rate
Friday 17 Jan. 2025
Gold 24 KT 79,500 /-
Gold 22 KT 73,900 /-
Silver / Kg 91,400 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above