Advertisement
रामटेक : रामटेक ते हिवरा बाजार रोडने टोलटॅक्स वाचविण्याकरिता अवैधरित्या रेती व कोयला वाहतूक होते. या मोठमोठ्या वाहनांमुळे रस्त्याची मोठी दुर्दशा झालेली आहे. रस्त्यावर मोठं मोठाली खड्डे पडली आहे, व त्या खड्यान मधे पावसाचे पाणी साचले आहे. पाणी साचल्याने वाहन चालकांना त्याचा अंदाज नसल्याने छोटे मोठे अपघातही होत आहे.
व नागरिकांना याचा मोठा सामना करावा लागत आहे.नागरिकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे की
रस्त्याने जाताना नागरिकांना भित भित जावे लागत आहे. रस्त्याची अशी दुरवस्था झालेली असून सुद्धा प्रशासनाचे व लोकप्रिनिधीचे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष का? या रस्त्याचे लवकरात लवकर दुरूस्तीकरन करण्यात यावे अशी मागणी कृषि उत्पन्न बाजार समिती चे माजी उपसभापत्ती किशोर रहांगडाले यांनी केली आहे.