मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल पांडेचे सर्वाइकल कॅन्सरमुळे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाऱ्यासारखी पसरली.तिच्या मॅनेजरने यासंदर्भात सविस्तर इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.अखेर २४ तासांनंतर या नाट्यमय घडामोडींनंतर पूनम पांडे जिवंत असल्याची माहिती समोर आली.
पूनम पांडेने स्वत: इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. मी जिवंत आहे, कर्करोगामुळे माझा मृत्यू झालेला नाही, असे तिने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
मी जिवंत आहे…सुदैवाने सरव्हायकल कॅन्सरमुळे माझं निधन झालेलं नाही. पण, आज देशातील हजारो महिलांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. कित्येक महिलांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. या गंभीर आजाराचा सामना कसा करायचा याबद्दल पुरेशी जनजागृती महिलावर्गात झालेली नाही. पण, तुम्हाला माहितीये का? सरव्हायकल कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी तुम्हाला वेळच्या वेळी आरोग्य तपासणी व HPV लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे. आपण एकत्र मिळून या आजाराबाबत जनजागृती करुया. तुम्ही माझ्या वेबसाइटला जरुर भेट द्या, असे पूनमने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.