नागपूर: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या बिनाकी उपविभागाच्या वतीने आयोजित वीज ग्राहकांच्या मेळाव्यात ३२ वीज ग्राहकांना तत्काळ वीज जोडण्या देण्यात आल्या.
पवनगाव रोड हनुमान नगर येथे आयोजित वीज ग्राहक मेळाव्याचे उद्धघाटन गांधीबाग विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल जिवतोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगर सेवक शेषराव गोतमारे , महेश पाटील उपस्थित होते. सदर उपक्रमा करिता एकात्मिक ऊर्जा विकास योजने अंतर्गत एक नवीन रोहित्र आणि लघु दाब वीज वाहिनी टाकण्यात आली. यावेळी एकूण ४८ नवीन वीज जोडणी डिमांड नोट वाटप करण्यात आली आणि त्या पैकी ३२ लोकांनी तातडीने डिमांड नोटचे पैसे भरुन नवीन वीज जोडणी जोडून घेतली.
सदर कार्यक्रम बिनाकी उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत भाजीपले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला गेला सदर कार्यक्रमात गांधीबाग विभागाकडून अविनाश शंकरपुरकर बिनाकी उपविभाग तर्फे अक्षय कोंबाडे, सचिन महल्ले, संतोष दुबे, राकेश सयाम, सुनील अतागरे, महेंद्र तिडके उपस्थित होते.