कन्हान : – ७ व्या वेतन अंतर्गत मिळणा ऱ्या दोन वर्षांतील पहिल्या हप्त्याची देयके तातडीने स्विकारुन जुलै महिन्यात हि रक्कम देय करावी. ७ व्या वेतन देयक स्विकारण्यासंदर्भात तातडीने अधिसूचना जारी करण्याची मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर तर्फे वेतन पथक अधिक्षकांकडे करण्यात आली.
विदर्भ प्राथमिक शिक्षक (प्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक ) संघातर्फे ७ व्या वेतन (7th pay) संदर्भातील विविध विषयांवर संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वाखाली वेतन पथक अधिक्षक श्री वाघमारे साहेब यांची माध्यमिक वेतन पथक कार्यालया त भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यात वित्त विभागाने ७ व्या वेतनचा थकीत पहिल्या हप्त्याचे देयक माहे जुलै मध्ये देण्याचे जाहीर केले.
त्यानुसार वेतन पथक कार्यालयाने जुन महिन्यात च्या थकीत हप्त्याचे देयक स्विकारायला हवे होते. मात्र अद्यापही वेतन देयक स्विकारण्याच्या सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. तातडीने या सूचना निर्गमित करुन ७ व्या वेतनचे थकीत देयक स्विकारुन जुलै महिन्यात वितरित करावे, माहे जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे थकीत अरियर्स तातडीने अदा करावे, शालार्थ प्रणालीतील घोळ दुरुस्त करण्यासाठी आपल्या स्तरावर विशेष शिबिराचे आयोजन करावे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी चर्चेत श्री वाघमारे यांनी सांगितले की, माध्यमिकचे १३५८९ तर प्राथमिकचे ४८३२ कर्मचारी आहेत. दर महिन्याला ३०० करोड रुपयांचे पगाराचे बजेट आहे. नागपूर जिल्ह्य़ात १७०० शाळा असून या पुरवणी बजेट मध्ये अतिरिक्त निधी मंजूर झाल्यास ७ व्या वेतनचा पहिला हप्ता कर्मचार्यांना देता येईल असे सांगितले.यावेळी शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सर, नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, नागपूर जिल्हा ग्रामीण संघटक गणेश खोब्रागडे, शहर संघटक रविकांत गेडाम, माध्यमिक विभाग संघटक राजू हारगुडे, काॅग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष संजय धरमाळी, रामटेक तालुका संघटक कमलेश सहारे, सिध्दार्थ ओंकार, जी. आर. तांदूळकर, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे प्रवीण गोडे, वैभव चिमनकर उपस्थित होते.