Advertisement
नागपूर – राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडत अजित पवारदेखील शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. सध्याची परिस्थिती पाहता जनतेच्या प्रश्नाशी सरकारला काहीही पडले नसल्याचे चित्र आहे.
भाजप जनतेची दिशाभूल करून सत्तेत आले आहे. ज्याप्रमाने अलीबाबा ४० चोरांची टीम होती. ते जनतेला लुटायचे, आज सरकारची अवस्था आहे. हे पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
भाजपने महाराष्ट्राचा चेहरा विद्रुप केला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार न करणे. ईडीची भिती दाखवून विरोधकांवर दबाव निर्माण करण्यात येत आहे. मलाईदार खात्यांसाठी खातेवाटप रखडला. त्यामुळे राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून यावर दखल घ्यावी, असेही पटोले म्हणाले.