Published On : Wed, Sep 4th, 2019

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा महत्वाचा निर्णय

फ्रूट वायनरी व्यवसायाला दिलासा
उद्योजकांकडून 1 रूपये इतके नाममात्र उत्पादन शुल्क

– फ्रूट वायनरी उद्योजकाला भरावा लागणार प्रति बल्क लिटर रू 1 इतके नाममात्र उत्पादन शुल्क
– जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन
– निर्णयामुळे कोकण पट्टयातील फळ उत्पादकांना होणार फायदा

Gold Rate
Tuesday 28 Jan. 2025
Gold 24 KT 80,300 /-
Gold 22 KT 74,700 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मुंबई: फळ व मीड वाईनच्या उद्योगाला चालना देण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने या व्यवसायांकडून द्राक्षव्यतिरीक्त सर्व वाईन्स व मीड वाईन्सवर प्रति बल्क लिटर रू. 1 इतके नाममात्र उत्पादन शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन दिल जाणार आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील फळ उत्पादकांना होणार आहे. या निर्णयात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व फळांचा उत्पादन कोकण पट्टयात मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यामुळे या भागातील फलउत्पादकाला निश्चितच याचा फायदा होईल.

द्राक्षाव्यतिरिक्त सर्व वाइन्स व मीड वाईन्सवर उत्पादन खर्चाच्या 100 टक्के उत्पादन शुल्क आकारण्यात येत होतं. याचा थेट परिणाम म्हणून इतर सौम्य मद्याच्या तुलनेत (बीअर व वाईन्स) या वाईन्स व मीड्स बऱ्याच महाग मिळतात. त्याचा परिणाम हा थेट विक्रीवर होत होता. बीअरच्या एका 330 मि.ली बाटलीची किंमत साधारण रू.150 -180 आहे. तर 750 मि.ली ची साधारण टेबल वाईन रू.250 ते 400 रुपये या दराने बाजारात मिळते.

या तफावतीचा परिणाम म्हणून हे वायनरी उद्योग दर महिना केवळ 700 ते 800 पेट्या महारष्ट्रात विकू शकत होते. शिवाय गेल्या 2 वर्षात या उद्योगात केवळ 4 नवीन उद्योजक जोडले गेले आहेत. त्यामुळे या वाईन उद्योगास चालना मिळण्याकरीता तसेच सं‍बंधित शेतकरी व आदिवासींना प्रोत्साहन देण्याकरीता उत्पादन शुल्क विभागाने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंदं इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून तयार होणाऱ्या वाईन/मद्यावर प्रति बल्क लिटर रू 1 इतके नाममात्र उत्पादन शुल्क आकरले जाणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या या निर्णयामुळे वाईन आणि इतर फळांपासून तयार होणाऱ्या मद्याच्या उत्पादनाला चालना मिळेल.

Advertisement