नागपूर: कामठी हे नागपूर रेल्वेस्टेशननजीक असलेले मोठे स्टेशन आहे. या ठिकाणाहून मोठ्या प‘माणात रेल्वे प्रवाशांची वाहतूक सुरु असते. या स्टेशनचा दर्जा ऊंचावून अ वर्ग स्टेशनच्या सर्व सुविधा कामठी रेल्वे स्टेशनला मिळाव्या अशी मागणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे दिल्लीत आज केली. रेल्वेमंत्र्यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
दिल्लीत या संदर्भात एक बैठक घेण्यात आली. कामठी सध्या डी वर्गाचे स्टेशन आहे. त्यामुळे प्रवाशांना आवश्यक असलेल्या आधुनिक सुविधा येथे उपलब्ध नाहीत. परिणामी प्रवाशांचे हाल होतात. कामठीजवळ कोराडी जगदंबा मंदिर हे प्र‘यात आहे. ड्रॅगन पॅलेस टेंपल प्रसिध्द आहे. वेकोलिची कार्यालये आहे. याशिवाय गार्ड रेजिमेंटल सेंटर आहे. या ठिकाणी सतत गर्दी होत असल्यामुळे प्रवाशांची ये-जा मोठ्या सं‘येने असते. त्यातुलनेत स्टेशनवर पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत.
नागपूर हावडा या महत्त्वाच्या मार्गावर कामठी स्टेशन असून दिवसभरात किमान 100 गाड्यांची वाहतूक येथून सुरु असते. कामठी स्टेशनवर दोन्ही फलाटांवर यांत्रिक पायर्यांची व्यवस्था पाहिजे. फलाटावर कोच पोझिशन सिस्टिम लावणे, अतिरिक्त फूटओव्हर बि‘ज, वाढीव फलाटावर शेड टाकण्यात यावे, अतिरिक्त प्रतीक्षालय, वायफाय सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी, गोंडवाना एक्स्प्रेसचा थांबा, सुलभ शौचालय आदी सुविधांची मागणी या बैठकीत करण्यात आली. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या सर्व विषयांवर सकारात्मक भूमिका घेत लवकरच या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न रेल्वेतर्फे करण्याचे आश्वासन दिले.