नागपूर : स्पोर्ट्स जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूर (एसजेएएन) तर्फे तिरुपती अर्बन बँक व नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या सहकार्याने मीडिया कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयोजित वॉकथॉन स्पर्धेत ईश्वर पोळकर, रणजित करूडकर, आशा महाजन व चारुलता पाटील यांनी विविध वयोगटांत अव्वल स्थान पटकाविले.
रविवारी सकाळी दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या परिसरात भर पावसात झालेल्या या तीन किमी अंतराच्या स्पर्धेला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारविजेते गिरीश गदगे यांनी हिरवी झेंडी दाखविली. प्रमुख अतिथी तिरुपती अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र राऊत यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी व रोख पुरस्कार देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, गिरीश गदगे व एसजेएएनचे अध्यक्ष डॉ. राम ठाकूर उपस्थित होते. पीयूष पाटील यांनी संचालन केले. अनुपम सोनी यांनी आभार मानले.
स्पर्धेचे निकाल : ५० वर्षांवरील गट (पुरुष) : ईश्वर पोळकर, राजेश शर्मा, शशिकांत रहाटे. (महिला) चारुलता पाटील, शीला बांते,
अनिता पेद्दूलवार. कुटुंबीय गट (महिला) : आशा महाजन, सरिता हूरमाडे, विशाखा लुले. ५० वर्षांखालील गट : (पुरुष) : रणजित करुटकर, नितीन बागडे, श्रीधर हातागडे.