पंजाब : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. याठिकाणी कोणत्या पक्षाचे सरकार सत्तेत येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीचे आतापर्यंतचे कल पाहता ४९ जागांवर भाजपा आघाडीवर आहे.
बहुमताचा आकडा ४६ असल्यामुळे भाजपाने बहुमतापेक्षाही अधिक जागांवर आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून सुरू केलेला जल्लोष थंडावला आहे.
सध्या काँग्रेस केवळ ३६ जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. नवी दिल्लीमधील काँग्रेस मुख्यालयाबाहेर सकाळपासून जल्लोष सुरू होता. मात्र भाजपाने आघाडी घेतल्यानंतर जल्लोष थांबविण्यात आला आहे. तसेच काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, आम्ही आशावादी आहोत. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ माहिती अपडेट करत नाही.
तीच माहिती वापरून माध्यमे बातम्या देत आहेत. पण आमच्या कार्यकर्त्यांकडून जी माहिती मिळत आहे, त्यानुसार आम्ही पुढे असल्याचे सुप्रिया म्हणाल्या. तर हरियाणात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी भाजपा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.