नागपूर : हुडकेश्वरमध्ये अल्पवयीन मुलाने आईसोबत मिळून मद्यपी पित्याची हत्या केल्याची धक्कादायक घाटना समोर आली आहे. मुकेश शंकरराव शेंडे (५७) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे. १९ जानेवारी रोजी हुडकेश्वरच्या त्यांच्या राहत्या घरी मुकेश याने दारू पिऊन पत्नी उर्मिला शेंडे आणि त्यांच्या मुलाशी वाद घालण्यास सुरुवात केली.
घटनेच्या रात्री सुरु झालेल्या वाद चिघळला.
ज्यामुळे किशोरने त्याच्या वडिलांना गादीवरून ढकलून दिले ज्यामुळे त्याच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. त्यानंतर मुलाने टॉवेलने त्याचा गळा दाबून खून केला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
तपासात असे दिसून आले की उर्मिलाने तिच्या मुलाला गुन्हा लपवण्यास मदत केली. तिने रक्ताचे डाग फिनाइलने साफ केले आणि पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नात मृतदेह पोत्यात भरण्यास मदत केली.
कुटुंबातील सदस्य मंगेश वामनराव शेंडे यांच्या तक्रारीवरून, हुडकेश्वर पोलिसांनी कलम १०३, २३८ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.