मुंबई :महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या अपात्र लाभार्थीची संख्या आणखी वाढणार आहे. राज्यभरात सुरू असलेल्या छाननी प्रक्रियेनंतर चालू महिन्यात आणखी दोन लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करीत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयाचे सहाय्य निधी देण्याची योजना आखली.
विधानसभा निवडणुकीत ही योजना महायुतीसाठी लाभदायक ठरली, साधारण २ कोटी ११ लाख ८६० महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या मात्र चालू फेब्रुवारीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांत करण्यात आलेल्या सामनी प्रक्रियेत अपात्रांच्या संख्येत भर पडली आहे.
या छाननी प्रक्रियेनंतर जवळपास २ लाख महिला अपात्र ठरल्या असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे या फेब्रुवारीचा हफ्ता या महिलांच्या खात्यात येणार नसल्याने या महिलांना मोठा धक्का बसला आहे.