मुंबई :लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीमधून महाराष्ट्रातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातही शिंदे गट आणि ठाकरे गटाचे उमेदवार आमने सामने असलेल्या मतदारसंघांमध्ये ही चुरस आणखीच वाढलेली दिसत आहे.
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकर यांना १ लाख ४० हजार ८७८ मते मिळाली असून शिंदे गटाचे रविंद्र वायकर अवघ्या १ हजार मतांनी मागे आहेत. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दीना पाटील यांनी भाजपाच्या मिहिर कोटेचा यांना मागे पाडलं आहे.
संजय पाटील यांना १ लाख ७२ हजार ९१४ मते आतापर्यंत मिळाली असून मिहिर कोटेचा ३ हजार १२५ मतांनी मागे आहेत. मुंबई दक्षिण विभागातून अरविंद सावंत यांना १ लाख २५ हजार ५९८ मते मिळाली असून शिंदे सेनेच्या यामिनी जाधव ३६ हजार ०२८ मतांनी मागे आहेत.
तर, दक्षिण मध्य मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांना १ लाख ९९ हजार ७७ मते मिळाली असून शिंदे गटाचे विद्यमान खासदार १५ हजार मतांनी मागे असल्याचे दिसते.