नागपूर: गेल्या काही दिवसांपासून शहरात गुंतवणूकदारांना दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांनी गंडविल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशीच घटना दिघोरी येथे राहणाऱ्या अंकुरकुमार अग्रवाल यांच्या सोबत घडली.
चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांची एकूण १८ आरोपींनी ५ कोटी ३९ लाख ५० हजारांनी फसवणूक केली आहे.
माहितीनुसार,आरोपींनी अग्रवाल यांना एक्स्वीम नेटवर्क इंडिया प्रा ली कंपनीच्या नावाने पैसे गुंतवल्यास तिमाही १५ ते २० टक्के पेक्षा जास्त परतावा मिळण्याचे आमिष दाखवून तसेच कंपनीचे खोटे एजंट बनून बनावट डिमांड ड्राफ्ट देवून फिर्यादी यांना ५,३९,५०,००० रुपये गुंतवण्यास सांगितले.
सदर रक्कम रोख स्वरुपात व वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करवून घेतली. त्यानतंर अग्रवाल यांची दिलेल्या सिक्युरीटी बँक चेकचा दुरुपयोग करुन फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अग्रवाल यांनी आरोपींविरुद्ध धंतोली पोलीस स्टेशमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी आरोपींविरोधात ४४०/२०२३ भादवि क. ४१९, ४२०, ४०६,१२०(ब), ३४ नुसार गुन्हा दाखल करत पुढील तापस सुरू केला आहे.
सदर आरोपींची नावे :
१.मुकेश चव्हाण (वय ३६, रा. रायगड )
२. मंदार कोलते (वय ४५, रा. नागपूर)
३. गोयल उर्फ सुरज डे,(वय ४५, रा.कांदीवली, मुंबई) ४. मंगेश पाटेकर उर्फ दिनेश कदम,( वय ४४ रा. मुंबई)
५. महोनिश उर्फ राहुल, (वय ३५, रा मुंबई)
६. अमन पांडे(वय ४०, रा० कांदिवली पूर्व मुंबई)
७. भारत उर्फ सुलेमान(वय ४०, मुंबई)
८. युनुस शेख, वय ४०( रा. हसनबाग, नागपूर)
९ दिनेश मिश्रा(वय ४२, कांदिवली पूर्व, मुंबई )
१०. अजय वाघमारे(वय ३३, मुंबई)
११. राकेश कुमार( वय ५०, रा. मुंबई )
१२. राजु मंडल(वय ४५, रा. मलाड, मुंबई)
१३. राहुल गायकवाड( वय २८, रा. गोरेगाव,मुंबई)
१४. संदिप पाटील (वय ३३, रा. गोरेगाव, मुंबई )
१५. अल्पेश पटेल( वय ३३, रा. गोरेगाव, मुंबई)
१६. करन(वय ३५ रा. गोरेगाव, मुंबई)
१७. दिनेश जोशी (वय ४५, रा. मुंबई)
१८. विक्रांत (वय ४७, रा. मुंबई )