Advertisement
नागपूर : विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या अभियंता तरुणाला यशोधरानगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
माहितीनुसार, विधवा महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेत अभियंता तरुणाने तिच्यावर दोन वर्षे लैंगिक शोषण केले. इतकेच नाही तर तिला लग्नाचे आमिषही दाखवले. आपली फसवणूक होत असल्याने लक्षात घेता. पीडित महिलेने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.यशोधरानगर पोलिसांनी युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. अमित गजानन गाठे (२९, बोर्डी, ता. अचलपूर. जि. अमरावती) असे आरोपी युवकाचे नाव आहे.
पीडित २९ वर्षीय विधवा कुसुम (बदललेल नाव) ही आईवडिलांसह राहते. तिच्या पतीचे अपघातात निधन झाले होते. आरोपी अमित गाठे हा अभियंता असून नागपुरातील एका कंपनीत नोकरी करतो.