नागपूर : नागपूर इन्स्टाग्रामवर मेत्री केल्यानंतर लग्नाचे आमीष दाखवून एका २५ वर्षीय युवतीशी शारिरीक संबंध प्रस्थापित करून अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, अमित सुनिल मालेवार (वय २९, रा. अभ्यंकरनगर, तुमसर जि. भंडारा ह. मु. बजाजनगर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २१ डिसेंबर २०२१ ते १० ऑक्टोबर २०२३ दरम्यान आरोपीचे हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २५ वर्षीय युवतीशी इन्स्टाग्रामवर मेत्री झाली.इन्स्टाग्रामवर चॅटींग करताना ते ऐकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या.
त्यानंतर आरोपी प्रियकराने तिला लग्नाचे आमीष दाखवून बजाजनगर येथे एका रुमध्ये नेऊन तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर युवतीने लग्नासाठी विचारले असता त्याने तिला नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने बजाजनगर पोलिसात तक्रार दाखल केली. बजाजनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी बोरकर यांनी आरोपीविरूध्द कलम ३७६ (२) (एन) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.