नागपूर : शहरात महिलांवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.यातच शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी नकार देणाऱ्या तरुणीवर युवकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अथर्व अशोक तुरकर (२१, तुमसर, भंडारा) असे आरोपीचे नाव असून पीडित १९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती आहे.
माहितीनुसार, १९ वर्षीय तरुणी भंडाऱ्याची असून नागपुरातील वर्धा रोडवर असलेल्या रेडिसन हॉटेलमध्ये नोकरीवर आहे. त्याच हॉटेलमध्ये आरोपी अथर्व तुरकर नोकरीवर होता. दोघेही एकाच हॉटेलमध्ये नोकरी करीत असल्यामुळे दोघांमध्ये ओळख होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. अथर्वने तरुणीला लग्नाचे आश्वासन देऊन जाळ्यात अडकवले.
सदर येथील खोलीवरून नेऊन वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या दरम्यान तरुणीला जेव्हाही लग्नाबाबत विचारत होती, तो टाळाटाळ तिला जीवे मारण्याची धमकी देत होता. आरोपीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने शेवटी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी पोक्सो ॲक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अथर्वचा शोध सुरू केला आहे.