Advertisement
नागपूर : मकरसंक्रातीच्या दिवशी लहानांपासून ते मोठ्यांमध्ये पतंग उडवण्याचा उत्साह असतो. मात्र यादरम्यान नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन महामेट्रोने केले आहे.
मेट्रो ट्रेनचे संचालन विद्युत प्रवाहाच्या माध्यमाने होतो. पतंग किवा मांजा या विद्युत तारांमध्ये अडकल्यास मोठी दुर्घटना घडू शकते तसेच ट्रेनचे संचालन होण्यास अडथळा निर्माण होऊ शकते. त्यामुळे पतंगप्रेमींनी पतंग उडविताना काळजी घ्यावी, असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले आहे.
त्यामुळे युवक आणि नागरिकांनी मेट्रो रेल्वे मार्गाजवळ पतंग उडवू नये. शिवाय पतंग व मांजा अडकल्याने मेट्रो सेवा प्रभावित होणार नाही, याची काळजी घ्यावी. मेट्रो सेवा सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत दर १५ मिनिटांनी आणि गर्दीच्या वेळेत दर १० मिनिटांनी उपलब्ध आहे, असे महामेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.