नागपूर: संपूर्ण महाराष्ट्रासह नागपुरातही घरोघर सुख, शांती आणि समृद्धीचा ठेवा घेऊन येणारी महालक्ष्मी विराजमान झाली आहे.पुढील तीन दिवस घरामध्ये वास्तव्य करणाऱ्या गौरी आपल्या पिलांसह विराजमान झाल्या आहेत. भाकरी आणि मेथीच्या भाजीचा पहिला नैवेद्य या वेळी महालक्ष्मींना दाखवण्यात येतो.लक्ष्मींच्या स्वागतासाठी आधीपासूनच सज्ज असलेल्या मखरात डोळे दिपवणारी रोषणाई आणि सजावट केली जाते.
नैवेद्याच्या १६ भाज्यांना महत्त्व -पालक, मेथी, चुका, आळू, अंबाडी, पत्ताकोबी, फुलकोबी, लाल भोपळा, गिलके, दोडके, गवार, वालाच्या शेंगा, कारले, भेंडी, पडवळ, शेवग्याच्या शेंगा, सिमला मिरची, दुधी भोपळा, चाकी (चक्री), चवळीच्या शेंगा यांपैकी १६ भाज्या केल्या जातात.
गौरीच्या आवाहनाचा शुभ मुहूर्त: २१ सप्टेंबर रोजी दुपारी १४. १६ मिनिटांनी सप्तमी सुरू होईल, त्यानंतर दुपारी ३. ३५ पर्यंत गौरीला घरी आणून आसनस्थ करावे.
ज्येष्ठा गौरी पूजन तिथी : २२ सप्टेंबर -ज्येष्ठा गौरी पूजन मुहूर्त : दुपारी १२ च्या आधी गौरी पूजन करून गौरीला नैवेद्य दाखवावा.
ज्येष्ठा गौरी विसर्जन तिथी : २३ सप्टेंबर – ज्येष्ठा गौरी विसर्जन मुहूर्त : सकाळी ९ ते दुपारी २. ५६ मिनिटांपर्यंत