नागपूर: नागपूर येथील दिव्यांग टेबल टेनिसपटू प्रतीक मोपकरने बर्लिन, जर्मनी येथे नुकत्याच झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्समध्ये भारतासाठी सुवर्णपदक पटकाविले आहे.
मोपकरने पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. त्याने पुरुष एकेरीच्या 30+ वयोगटातील डिव्ह अ मध्ये चौथे स्थान देखील मिळविले. तसेच फरीदाबाद, नोएडा आणि गांधी नगर येथील निवड चाचण्यांवरील कामगिरीच्या आधारे प्रतीकची विशेष ऑलिम्पिक भारताने निवड केली.
आजोबा कै. अविनाश मोपकर (आंतरराष्ट्रीय पंच) यांच्याकडून टेबल टेनिसचे थमिक धडे घेतलेल्या प्रतीकला आता वडील मंगेश मोपकर (आंतरराष्ट्रीय पंच) आणि काका राजेश मोपकर (आंतरराष्ट्रीय पंच) यांच्याकडून प्रशिक्षण दिले जाते. त्याला अॅड आशुतोष पोतनीस, सचिव, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन आणि नागपूर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांचेही प्रचंड सहकार्य लाभले.