Published On : Mon, Sep 25th, 2023

नागपुरात पुरामुळे लोकांचे संसार उध्वस्त झाले,पण सरकारला घेणेदेणे नाही; विलास मुत्तेमवारांचे टीकास्त्र

Advertisement

नागपूर : शहरात शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. अनेकांच्या घरात, दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना मोठे नुकसान झाले आहे. मात्र हे सर्व काही सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट आणि अनियंत्रित कारभारामुळे झाल्याचा घणाघात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी केला. ते आज काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

दहा हजारांहून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवन उपयोगी साहित्य खराब झाले आहे. हजारो दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यावसायिकही संकटात सापडले आहेत. नुकसानीच्या तुलनेत सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे, असेही मुत्तेमवार म्हणाले. गेल्या १७ वर्षांपासून नागपुरात महानगर पालिकेवर भाजपाची सत्ता आहे. मात्र शहरात केलेल्या निकृष्ट दर्जांच्या कामाचे दुष्परिणाम येथील जनतेला भोगावे लागले. त्यामुळे जनतेचा फडणवीस यांच्या विरोधातील रोष बरोबर होता. तसेच गडकरींचे नाग नाल्यात बोट चावल्याचे स्वप्न नागपुरात बोट चालवून पूर्ण झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

Advertisement

भाजपने नागपूरकरांचा विश्वासघात केला : पटोले

नागपूर शहरातील पूर परिस्थिती ही गेल्या काही वर्षातील नागपूर महानगरपालिका आणि राज्यातील विद्यमान भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा दुष्परिणाम आहे, अशी टीका पटोले यांनी केली. भाजपने नागपूरकरांचा विश्वासघात केला आहे.

सत्ताधाऱ्यांच्या चुकीमुळे झालेल्या या नुकसानीची जबाबदारी घेऊन पंचनामे करून नागरिकांचे आणि व्यावसायिकांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी मदत करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.