नागपूर :राज्यभरात मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. आवडता मोदक हा पूर्वी घरातील महिला घरीच तयार करायच्या. मात्र आता काळानुरूप बहुतांश घरी बाजारातूनच मोदक मागविले जातात. यंदा बाप्पाच्या अतिप्रिय मोदकाच्या दारात ५ ते १० टक्क्यांची वाढ झाली असून याचे भाव गगनाला भिडले आहे. दूध, खवा आणि साखरच्या दरात वाढ झाल्याने मिष्ठान्नाच्या दरातही भाववाढ झाली आहे. दुधाचा प्रतिलिटर दर ६९ रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत तर खवा प्रतिकिलो ३५० ते ४०० रुपयांवर आहे. त्यामुळे मोदक, लाढूचे दर वाढले आहे.
देशात वाढत चाललेल्या महागाईचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. बाजारात पांढरे, मिल्क व चॉकलेटी मोदक असे विविध मोदक सरासरी प्रतिकिलो ७०० ते १००० रुपये, तर गूळ आणि गव्हापासून बनवलेले चूर्म मोदक ६०० ते ७०० रुपये प्रति किलोच्या घरात आहे. उकडीच्या मोदकासह विविध फ्लेवर्सच्या मोदकाचे दर ९०० रुपयांपासून ११०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे.