Published On : Wed, Mar 13th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात युवकाची २६ लाखांनी फसवणूक ; पैशाचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी पैसे उकळले !

Advertisement

नागपूर : झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांच्या टोळीने एका युवकाची एका महिन्यात २६ लाख ८५ हजार रुपयांनी फसवणूक केली. सायबर गुन्हेगारांच्या टोळीने त्या युवकाला व्यवस्थितपणे जाळ्यात अडकवून पैसे उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकाने पोलिसात तक्रार दिली. निलेश देवनाथ खापरे (३५, रा. विनोबाभावे नगर) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे.

माहितीनुसार, २0 फेबु्वारी ते ११ मार्च यादरम्यान निलेश खापरे याला इंस्टाग्रामवर एक जाहिरात दिसली. त्यात स्टॉक मार्केटमध्ये ५ ते १0 टक्के नफ्याबाबत सांगितले होते. त्यानंतर आरोपी जिया शंकर अ‍ॅडमीन हिने निलेशला पैशाचे आमीष दाखवून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर जोडून घेतले. आरोपी पूजा आणि आर्यन रेड्डी यांनी संगनमत करून निलेश यांना वेगवेगळया ट्रान्जेक्शन आयडी दिल्या. तसेच त्यांना विश्वासात घेऊन त्यांना २६ लाख ८५ हजार रुपये लाईन व आरटीजीएसद्वारे भरण्यास भाग पाडले.

Gold Rate
Friday 28 March 2025
Gold 24 KT 89,400 /-
Gold 22 KT 83,100 /-
Silver / Kg 101,900 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आरोपींनी त्यांना कोणत्याही प्रकारचा नफा किंवा मुद्दल परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी निलेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.

Advertisement
Advertisement