नागपूर: नागपूर सुधार प्रन्यासच्या २०२२-२३ या वर्षीच्या अर्थसंकल्पात विविध विकास कामांसाठी रु. ९२७.७५ कोटी खर्च करण्यात येणार आहे. स्टेशन रोड, सदर स्थित नागपूर सुधार प्रन्यासच्या मुख्यालयात आज बुधवार, दिनांक ३० मार्च रोजी झालेल्या नासुप्र’च्या वार्षिक अर्थसंकल्पीय बैठकीत नासुप्रचे सभापती तथा ‘नामप्रविप्रा’ चे आयुक्त मा. श्री. मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र.से.), नासुप्र विश्वस्त व पश्चिम नागपूरचे आमदार मा. श्री. विकास ठाकरे, नासुप्र विश्वस्त व नगर रचना विभागाचे सह संचालक श्रीमती सुप्रिया थुल, नासुप्रचे विश्वस्त मा. श्री. संदीप ईटकेलवार, नासुप्रचे महाव्यवस्थापक श्री. निशिकांत सुके, अधिक्षक अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, कार्यकारी अधिकारी श्री. अनिल राठोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. विलिन खडसे व ईतर अधिकारी उपस्थित होते. या सभेत विश्वस्त मंडळाने विविध विषयांना मान्यता प्रदान केली. मंजुरी प्रदान करण्यात आलेले विषय पुढील प्रमाणे आहे.
‘नासुप्र अर्थसंकल्प २०२२-२३’ चे ठळक वैशिष्टये
१) सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात नासुप्र निधीतून घरबांधणी कार्यक्रम रू. १५० कोटी व भुखड व दुकानाच्या भाडेपट्ट्याद्वारे प्रव्याजी रु. ३५ कोटी जमा अपेक्षीत आहे.
२) सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र गुंठेवारी विकास अंतर्गत एकंदर ९५ कोटी प्राप्त होणे अपेक्षित असून ५७२, १९०० आणि नविन अभिन्यासामध्ये मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी रू. ६५ कोटी खर्च करण्यात येणार आहे.
३) सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये नासुप्र निधीतून विकासाची विविध कामे व रस्त्यांचे डांबरीकरण या शिर्षांतर्गत रु. १०५ कोटी खर्च करण्याचे प्रावधान करण्यात आलेले आहे.
४) सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये नागपूर सुधार प्रन्यासचे दोन विभागीय कार्यालयाच्या इमारती बांधकाम व इतर करिता रू. १५ कोटींचे प्रावधान केलेले आहे.
५) सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये दलित वस्ती सुधार योजना, दलितेत्तर वस्ती सुधार योजना आमदार निधी खासदार निधी, मौजा मानेवाडा येथील ई-लायब्ररी, इस्लामिक कल्चरल सेंटर, महाराष्ट्र सुर्वण जयंती नगरोत्थान महाअभियान, इत्यादी अंतर्गत विविध विकास कामापोटी रु. ४१२.७३ कोटींचे प्रावधान केलेले आहे.
६) शासन निर्णयानुसार सातव्या वेतनाचा लाभ सर्व कार्यालयीन अधिकारी / कर्मचारी निवृत्ती वेतन धारक यांना देण्यात येत असल्याने आस्थापना खर्चामधे रु ९६.०० कोटींचे प्रावधान करण्यात आलेले आहे.
७) नागपूर शहरामधे जन सुविधा केंद्रांकरिता रु. ३ कोटींचे प्रावधान करण्यात आलेले आहे.
८) आर्शिवाद नगर, कळमना येथील मार्केटचा विकास करण्याकरिता रु ५ कोटींचे प्रावधान करण्यात आलेले आहे.
९) नासुप्र क्षेत्रात सिवेज ट्रीटमेंट प्लांट व मेन सिवर सांडपाण्याची तृतीयक प्रक्रियेच्या कामाकरिता रु. १५ कोटींची प्रावधान करण्यात आलेले आहे.
१०) खेळाचे मैदानाचा एकात्मिक विकास करण्याकरिता नासुप्र निधीतून रू. १० कोटींचे प्रावधान करण्यात आलेले आहे.
११) नविन रस्ते बांधणीसाठी रू. ५ कोटींचे प्रावधान करण्यात आलेले आहे.