महावितरणची नागपूर जिल्ह्यातील त्रिसुत्री मोहीम
नागपूर : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या त्रिसुत्री मोहिमेतील एक गाव-एक दिवस या महावितरणच्या उपक्रमातून नागपूर जिल्ह्यात ३४ गावांमध्ये ९५८ कामे करण्यात आली आहेत.
नागपूर परिमंडल कार्यक्षेत्रात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात हि मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नामदार डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हि मोहीम येत्या काळात अधिक गतिशील करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली. नागपूर जिल्यात हि मोहीम सुरु केल्यावर आतापर्यंत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे ३०८ कामे, वीजबिल व वीजमीटर संदर्भातील ६५० तक्रारींचे निवारणचा समावेश आहे.
ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी नागपूर जिल्ह्यातील , मौदा,रामटेक, कामठी, सावनेर तालुक्यातील काही गावात एक गाव – एक दिवस हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यातील गावात येत्या काळात हि मोहीम सुरु करण्यात येणार असल्याचे महावितरण कडून स्पष्ट करण्यात आले. या मोहिमेत गावकऱ्यांशी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी थेट संवाद साधून मोबाईल अँप, वीजसुरक्षा व ग्राहक सेवेबाबतच प्रबोधन करण्यात येत आहे.
महावितरणकडून करण्यात येणाऱ्या कामामध्ये तारांमधील झोल काढणे, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्या, झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सची स्वच्छता व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, गांजलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे, मीटर घराबाहेर काढणे अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत.
एक गाव एक दिवस या उपक्रमाची पूर्वमाहिती दिल्यानंतर संबंधीत गावात महावितरणचे अभियंता व जनमित्र तसेच बिलिंग स्टॉफ एकाच दिवशी ग्राहकसेवेचे काम करीत आहेत. वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीचे कामे तसेच इतर ग्राहकसेवा गावातच उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थ मोठ्या आनंदाने महावितरणला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. प्रभारी मुख्य अभियंता श्री. दिलीप दोडके , नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता श्री. नारायण आमझरे , कार्यकारी अभियंता सर्वश्री अमित परांजपे, प्रफुल लांडे, कुलदीपक भस्मे, राजेंद्रकुमार मलासने, राजेंद्र गिरी यासाठी मेहनत घेत आहेत. कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणकडून सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात करण्याच्या सूचना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.